प्रोपज डे
ऐक ना सखे…
आज प्रोपज डे आहे गं 💞
तुला प्रोपोज करायला
मोठे शब्द नाहीत माझ्याकडे,
फक्त एवढंच सांगतो—
तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो
आणि आयुष्यभर
तुझी साथ देईन.
कारण माझं प्रेम
दिखाव्यासाठी नाही गं…
मी तुझ्यावर प्रेम करतो सखे,
जिवापाड प्रेम करतो,
देखाव्यासाठी नाही,
माझा जीवच गुंतलाय
तुझ्यात.
तू होकार देशील की नाही,
हे सखे, नशिबावर सोडतो,
पण आज एवढंच सांगतो—
तू माझ्या आयुष्याची
सवय झाली आहेस…
आणि सखे,
सवय
प्रेमापेक्षा
खूप खोल असते.
आज प्रोपज डे आहे,
म्हणून विचारत नाही,
फक्त सांगतो—
सखे, तू आहेस
म्हणून मी आहे.
सदैव तुझ्यासोबत राहीन,
प्रत्येक क्षणी
तुझी साथ देईन… 🌹
I love you 😚🫂
**✍ विनायक भिसे, बारामती**
*मानसिक आरोग्य समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ*
**Mo – ** 7798150143